“केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी…”, रुपाली चाकणकर कडाडल्या
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआय चौकशी करत आहे. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे.जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे. लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत, असे चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 24, 2021
मोजक्या शब्दांमध्ये अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
सीबीआयची टीम घरी तपासणीसाठी आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता मी नागपुर जिल्ह्यात ज्या पद्धतीने करोना वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काही कोविड सेंटरला भेट देण्यासीठी काटोलला चाललो आहे.” असं अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले व त्यानंतर ते नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रवाना देखील झाले.
…पण सीबीआयने धाडच टाकली – जयंत पाटील
सीबीआयने न्यायालयाकडून प्राथमिक चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. या माध्यमातून सीबीआय अनिल देशमुख यांची बदनामी करून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!