खळबळजनक ! जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना एसबीओए शाळेसमोर मयूर पार्क येथील तुळजाभवानी चौकात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सूत्राने सांगितले. यश जयंत महेंद्रकर (रा. नवजीवन कॉलनी,एन-१२, हडको), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, यश महेंद्रकर याचा एका तरुणासोबत जुना वाद होता. यशने शनिवारी रात्री मयूर पार्क येथील तुळजाभवानी चौकात राज नावाच्या तरुणाला तडजोड करण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्यांच्यात वादावादी सुरू झाली. तेव्हा राजने अचानक यशच्या छातीत चाकूने वार केला. वार केल्यानंतर मारेकरी राजपूत याने घटनास्थळावरून पळ काढला यश यास गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टर यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिडको आणि हरसुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्री अकरा वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन तपासणी सुरू केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळावर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यश महेंद्रकर याची हत्या नेमक्या कोणत्या कारणाने झाली, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.