विनाकारण फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह ; भिगवण पोलिसांची विशेष मोहीम

भिगवण (नारायण मोरेे) :कोरोनाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजविला जात असताना तसेच कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विना कामाचे फिरताना दिसून येत आहे.या मोकाट वीरांना आवर घालण्यासाठी आणि सुपर स्प्रेडर समाजात फिरून संसर्ग वाढवू नये यासाठी इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मदनवाडी ब्रिज खाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी केली.

याबाबत भिगवण पोलीस अधिकारी जीवन माने यांनी दिलेल्या माहिती नुसार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविण्यात आली. महसूल विभाग तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या या तपासणीत २२४ पैकी २६ नागरिक पौझिटिव्ह आल्याची माहिती प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनिता पाळंदे यांनी दिली.यावेळी तहसीलदार अनिल ठोंबरे ,तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी भिगवण पोलिसांनी २५ पोलीस कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त लावीत चारही बाजूने येनाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना थांबवून कोरोना तपासणी केली. अनेक नागरिक पोलिसांना आपण दवाखान्यात चाललोय ,मेडिकल मध्ये चाललोय ,दवाखान्यात डबा देण्यासाठी चाललोय अशी समर्पक कारणे देत होते .मात्र पोलीस कोणाचेही कारण न एकता तपासणी करण्यास लावत होते.

याकामी आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळा तंत्रद्न सुनिता पाळंदे ,लॅब टेक्निशन प्रवीण बनसुडे ,आरोग्य सेविका रेश्मा भिंगारदिवे ,तलाठी भारती तसेच शिवाजी शेलार यांनी तपासणीचे कामात मदत केली

यावेळी पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मोकाट फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जन पोझीटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी कोविड सेंटर येथे पाठविल्याचे सांगितले.तसेच लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.तसेच मोकाट फिरणाऱ्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश झाल्यावर पुन्हा हि कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.