थेरगाव मधील मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कंपनीत आग लागल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवडमधील थेरगावात पी. के. मेटल्स या मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कंपनीत शनिवारी (दि.२४) रोजी दुपारच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली होती. केमिकल कंपनीत मॅग्नेशियम पावडरचा स्फोट  एवढा भीषण होता की सिमेंटच्या भिंती तुटून पडल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजिंदरकौर प्रितपालसिंग कंधारी (वय 65), प्रितपालसिंग कंधारी (वय 70, दोघेही रा. बाणेर, पुणे) आणि पी.के. मेटल्सचे व्यवस्थापक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट कौलगे यांनी रविवारी (दि. 25)  वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 24) दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास थेरगाव येथील पी.के. मेटल्स या कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन आग लागली. ही कंपनी रहिवासी भागात असून.याठिकाणी सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी घेण्यात.आलेली नव्हती. पी. के. मेटल्स कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मानवी जिवितास धोका निर्माण झाला. तसेच आसपासच्या दुकानांचे स्फोट आणि आगीमुळे नुकसान झाल्याचे फिर्यादी म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.