पुण्याच्या गुन्हे शाखेतील उपनिरीक्षकाने 21 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टला लावला हात, 16 वर्षीय तरूणीच्या छातीस दाबले; गुन्हा दाखल

पुणे: रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाइकासोबत दारू प्यायल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने 21 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला तसेच 16 वर्षीय तरूणीच्या छातीस दाबले.याप्रकरणी गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस उपनिरीक्षकावर विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत २१ वर्षीय फिर्याद  दिली आहे. त्यानुसार उपनिरीक्षक दीपक माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माने हे गुन्हे शाखेच्या युनिट चार येथे नेमणुकीस होते. मागील आठवड्यात (दि. 17) चतुःशृंगी परिसरात गुन्हे शाखेने रॅमिडेसिव्हीर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन भावडांना अटक केली. तर त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते. त्यानंतर उपनिरीक्षक माने यांची आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर माने पार्टीसाठी गेले होते

मद्यपान केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याने तरूणीशी अश्लिल वर्तन करुन तिची छेडछाड केली. पोलिस उपनिरीक्षक मानेने 21 वर्षीय तरूणीशी अश्लील वर्तन केले तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावुन तिच्या मनास लज्जा उत्पनन केली. मानेने तक्रारदार तरूणीच्या 16 वर्षीय बोलावून तिचा हात धरून तिला जवळ ओढले अन् तिच्या छातीस दाबले. तसेच नातेवाइकांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी चौकशीनंतर केल्यानंतर माने याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. आता मुलींनी तक्रार केल्यानंतर मानेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा चतुःश्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.