पोलिसांकडे फिर्याद करणार्या तरूणाच्या वडिलांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला
पुणे : तलवारीने वार केल्याप्रकरणी पोलिसांत दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी सराईत गुन्हेगारांनी फिर्याद करणाऱ्या तरुणाच्या वडिलांना मारहाण करत कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. हडपसर भागात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे.
याप्रकरणी बबलूसिंग टाक (वय 31, रा. रामटेकडी) याला अटक केली आहे. तर डब्ल्युसिंग टाक, ऋतिक रांगडा, राम भेडवाल यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजू माने (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान त्यांनी फिर्यादी यांच्या मुलाला अडवत त्याच्यावर तलवारीने वार करत गळ्यातील चैन चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना दोन दिवसांपूर्वी प्रगती शाळेसमोर आल्यानंतर अडविले. तसेच, त्यांना तुमच्या मुलाने दिलेली तक्रार माघे घे, असे म्हणत वाद घातला. तर त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पसार झालेल्या एकाला पकडले. तर सराईत गुन्हेगार पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माने हे करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!