राज्यातील विविध शहरांमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, पुणे गुन्हे शाखेच्या युनीट दोनची कामगिरी

पुणे : राज्यातील विविध शहरांमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केले. त्याच्याकडून पोलिसांनी चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून 9 लाख 60 हजारांचे दागिने जप्त केले आहेत. त्याच्याविरूद्ध 100 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. रमेश महादेव कुंभार (वय 43, रा. काल्हेर, भिवंडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2016 मध्ये घरफोडी केलेला सराईत गुन्हेगार भिवंडीतील काल्हेरमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस अमंलदार गजानन सोनुने आणि अजित फरांदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले व पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून रमेश कुंभारला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी रमेश कुंभार सराईत असून त्याच्याविरुद्ध पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, संभाजीनगर, नाशिकमधील अनेक पोलीस ठाण्यातंर्गत 100 पेक्षा विविध जास्त गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, यशवंत आंब्रे, गजानन सोनुने, अजित फरांदे, कादीर शेख, समीर पटेल, उत्तम तारू, मीतेश चोरमोले, निखील जाधव यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.