1 मेनंतर देखील लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य : महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : पुणे शहरांमध्ये लसीकरण मोहिमेने सुरुवातीला वेग घेतला होता. मात्र नंतर येणाऱ्या लसीची संख्या कमी झाल्याने अगदी थोड्या लोकांना लस मिळायला सुरुवात झाली होती. अपॉईंटमेंट घेऊनही अनेक नागरिकांना स्टॉक नसल्याने परत फिरावं लागत होतं.
थेट वॉक इन लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर आता 1 तारखेपासूूून 18 वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे.
हे सुरु झाल्यानंतर दुसऱ्या डोसचे लसीकरण कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत आज (दि. 26) अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याविषयी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले “28 दिवसांत जवळपास 4 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापुढे लस कमी असल्याने प्राधान्याने 1 तारखेनंतर 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरु होईल, त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकारच्या आदेशानंतर 1 तारखेनंतर खासगी रुग्णालयाला लस पुरवली जाणार नाही. त्यामुळे आता महापालिकेला आलेल्या सगळ्या लसी महापालिकेच्या केंद्रावर वापरली जातील”.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!