ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळेची आत्महत्या

पुणे: ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या महिलेने उडी मारुन आत्महत्या  केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मात्र ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पडली असावी असाही अंदाज पोलीस वर्तविला आहे. परंतु, या आत्महत्या प्रकरणाने शहर पोलीसद दलासह शहरात खळबळ उडाली आहे.

दिप्ती सरोज काळे (रा . ज्ञाती इक्वोटेरियम , सिडम , बावधन) असे मृत्यू झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दीप्ती काळे आणि इतर काही आरोपींवर पुणे पोलिसांनी आजच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. काही दिवसापूर्वी पोलिसांनी तिला एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयातील ८ व्या.मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. ही घटना आज.(मंगळवार) दुपारी 4 वाजण्याच्या पूर्वी घडली. ससून रुग्णालयात दीप्तीवर उपचार करण्यात येत होते.
त्यावेळी ती बाथरुममध्ये गेली होती. त्यानंतर ती ससूनच्या आवारात ती मृतावस्थेत आढळून आली. ती ज्या बाथरुममध्ये गेली होती त्या गेली होती त्या बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा काढून ठेवलेल्या आढळून आल्या आहेत. तेथून बाहेर पडण्यासाठी अरुंद बोळातील.पाईपावरुन खाली उतरताना पडून तिचा मृत्यु झाला.असावा, असा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी सागितले आहे.

दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १०  वर्षात संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्ये प्रवृत्त करणे, कट करुन खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करुन अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत असा पोलिसांचा आरोप होता.

दिप्ती  काळे  आणि निलेश उमेश शेलार यांनी 2018 ते 2020 कालावधीत एका ज्वेलर्समध्ये गुंतवणुक केली होती. त्यानुसार पैसे परत मागण्यासाठी ते वेळोवेळी जेल्वर्स दुकानदार यांच्या घरी आणि दुकानावर येऊन शिवीगाळ व धमकी देत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन असभ्य भाषेत बोलून त्यांच्या मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक देखील केली आहे.

या गुन्ह्याचा तपास करत असताना दीप्ती काळे हिने गुन्हेगारी टोळी तयार केली असून मागील दहा वर्षापासून कट करून खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करून खंडणी मागणे, बनावट व्हिडीओ तयार करून संगणक साधनसामुग्रीचा वापर करून अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे सिद्ध झाले आहे. मागील दहा वर्षापासून टोळी प्रमुख दीप्ती काळे आणि तिच्या टोळी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान आजच मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील टोळीप्रमुख अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलार यांच्यावर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अ‍ॅड. काळे हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकाशी शारीरीक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच आणखी ५८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यापुर्वी देखील दिप्ती काळे हिने एका कॅांग्रेस नेत्यावर गंभीर आरोप करुन खळबळ उडवली होती.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.