गोवा राज्यातील दारुचे 1200 बॉक्स जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बाभळेश्वर परिसरात साफळा रचून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली गोवा राज्यातील दारुचे 1200 बॉक्स आणि आयशर ट्रक असा 94 लाख 88 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

गहु देविसिग मिल (वय -35, वर्ष रा. रामुखेडी खुडेल जि. इंदोर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नगर येथील दारुबंदी विभागास अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार श्रीरामपूरच्या भरारी पथक क्र. दोन या विशेष पथकाने बाभळेश्वर, अस्तगाव परिसरात सापळा लावला होता. नगर-मनमाड रोडवरील अस्तगाव फाटा येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली अवैध मद्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक (एम.एच. 18 बी.जी. 5274)ची तपासणी केली असता 74 लाख 88 हजार रुपये किंमतीच्या रॉयल ब्लु व्हिस्कीच्या 180 मि.ली.च्या57 हजार 600 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूच्या बाटल्यांसह 20 लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा ट्रक जप्त केला.

गोवा राज्यांतील दारु प्रकरणात अंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता असल्याचा संशय दारुबंदी विभागास आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा संबंध आहे का, त्या द्रुष्टीने तपास सुरू आहे.
गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नगर

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.