राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : राज्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण आता लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे.मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन कायम ठेवणे गरजेचं आहे. मंत्र्यांनी 15 दिवस लॉकडाऊन वाढीचा आग्रह धरला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबची घोषणा करतील.

राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.

राज्यात सरसकट सर्वांच मोफत लसीकरण

 

राज्यातील 18 ते 14 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल.

 

लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार

सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.