राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर ; राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून या लसीकरण मोहिमेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान लसीकरणाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी नोंदणी करूनच लस घेण्यासाठी जावं. थेट केंद्रावर गेल्यास लसीकरण होणार नसल्याचं टोपेयांनी स्पष्ट केलं असून सर्वांनाच समंजसपणे काम करावं लागणार असल्याचे त्यांनी म्हटलं.

लसीच्या उपलब्धतेबाबत टोपे म्हणाले की, आपल्याकडे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी आहेत. कोव्हिशिल्डचे १ कोटी डोसेस दर महिन्याला देऊ असं कंपनीने सूचित केलं आहे. मात्र कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरणात रशियाच्या स्फुटनिक Vलसीचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात सरसकट सर्वांच मोफत लसीकरण

 

राज्यातील 18 ते 14 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.