रेमडेसिवीर उत्पादन कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भेट

मुंबई : कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावीत यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही डॉ.शिंगणे यांनी या कंपन्यांना केले आहे.

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे व त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा भासत आहे. या औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल या अनुषंगाने डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तारापूर MIDC तील मे.कमला लाईफ सायन्सेस या उसनवारी परवान्यावर काम करणाऱ्या कंपनीस भेट दिली व कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला. कंपनी दर दिवशी 35000 रेमडेसिवीर वायल्स (vials) ची निर्मिती करत असून कंपनीने आतापर्यंत 6 लाख वायल्सची निर्मिती केली आहे, त्यातील 4 लाख वायल्स सिप्ला कंपनीस दिल्या व सुमारे 2 लाख वायल्स पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे चेअरमन डॉ. झंवर यांनी सांगितले.

या कंपनीची रेमडेसिवीर liquid injection व lyophilized injection निर्माण करण्याची एकत्रित क्षमता 2 लाख वायल्स दर दिवस इतकी आहे.

मे. कमला लाईफ सायन्सेस ही इंजेक्शन निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती त्यांच्या क्षमतेच्या 10 टक्के उत्पादन सिप्लासाठी करते व उर्वरित इतर औषधांच्या उत्पादन कंपन्यांसाठी करते.

कंपनी जुबिलेंट, हेटेरो, डॉ.रेड्डीज इ. यांचेसाठीही रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन करणार असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.

सिप्ला कंपनीचा रेमडेसिवीर injection साठी लागणारा API (Active pharmaceutical ingredients) त्यांचेकडे असून ते liquid injection च्या 35000 च्या 3 बॅचेस व lyophilized injection ची एक बॅच तयार करू शकतात. उत्पादनासाठीचा सहायक घटक Betadex आयात केला जातो, त्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास अधिक उत्पादन करता येईल व रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर डॉ.शिंगणे यांनी तारापूर MIDC येथिल मे.नेप्रड प्रा. लि. या कंपनीस भेट दिली. ही कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन (lyophilized) उसनवार परवान्यावर निर्माण करते. त्यांची पहिली  बॅच 12 मे, 2021 रोजी बाजारात येईल. त्यांची रेमडेसिवीर lyophilized निर्माण करण्याची क्षमता 15000 वायल्स प्रतिदिन व liquid injection ची क्षमता 12000 वायल्स प्रतिदिन आहे.

Lyophilized injection च्या पहिल्या बॅचच्या 4 दिवसानंतर दुसरी बॅच घेता येते. Sterility testing साठी 14 दिवस लागतात. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत express sterility टेस्टिंगची परवानगी मिळाल्यास टेस्टिंग 2 दिवसात करता येईल व 6 दिवसात बॅच release करता येईल.

तसेच liquid Inj. ची बॅच दररोज उत्पादन करुन चाचणी हैद्राबाद येथे केल्यास तिसऱ्या दिवशी बॅच Release करता येईल, अशा प्रकारे राज्यात रेमडेसिवीरचे उत्पादन वाढविता येईल व मागणी पूर्ण करता येईल, असेही दोन्ही उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले.

या भेटीत शासन व अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.