बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तिघांना कामशेत पोलिसांकडुन अटक
कामशेत;कामशेत येथील पवना चौकामध्ये बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तिघांना कामशेत पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राम कानगुडे यांनी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगल्या प्रकरणी अमोल श्रीराम मोहोळ (वय २२), रोहित संजय भवार (वय १९), कृष्णा गोपाळ भोपळे (वय २१ सर्व रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ जि. पुणे) यांना कामशेत पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. रविवारी (दि.२५) कामशेत शहरातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील पवना चौकात बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारे येणार असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारा मार्फत पोलीस नाईक राम कानगुडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस नाईक राम कानगुडे, पोलीस हवालदार समीर शेख, महेंद्र वाळुंजकर व सागर बनसोडे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने पवना चौक येथील रत्ना अमृततुल्य या दुकानासमोर रोडच्या कडेला उभ्या असलेल्या अमोल मोहोळ, रोहित भवार व कृष्णा भोपळे यांना सापळा लाऊन ताब्यात घेतले व त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व मॅक्झिन मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना गुरुवार (दि. २९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र वाळुंजकर करत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!