कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून अपघात ; दोघांचा मृत्यू

पुणे : कात्रज बोगद्याजवळ मंगळवारी रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. मृत व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे तर दुसऱ्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. ही घटना मंगळवारी सांयकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली.

अभिषेक किशोर कदम (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मृत पादचाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पादचारी 35 ते 40 वयोगटातील असून त्याने निळ्या रंगाचा शर्ट, लुंगी परिधान केलेली आहे. राहूल दावणगावे (वय 26, रा. बिबवेवाडी) असे अपघातात जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.आर.कवठेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक व राहूल हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही स्थापत्य अभियंते असून ते शहरातील बांधकाम प्रकल्पांवर काम करतात. अभिषेकने मंगळवारी सांयकाळी राहूलला आपल्या दुचाकीवर बसवून खेड शिवापुर येथे नेले होते. तेथून सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ते दोघेजण पुण्याकडे येत होते. त्यांची दुचाकी मुंबई-बंगळुरू महामागार्वरील नवीन कात्रज बोगद्याजवळ त्यांची दुचाकी आली.

अभिषेक हा दुचाकी चालवित होता. त्यावेळी त्यांच्या भरधाव दुचाकीने अनोळखी व्यक्तीला उडविले. त्यानंतर दुचाकी घरून अभिषेक व राहूल हे दोघे तसेच दुचाकीची ठोकर बसल्याने व खाली पडल्यामुळे पादचारीही गंभीर जखमी झाला होता. तिघांनाही उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अभिषेक व पादचारी दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यु झाला. तर राहूल दावणगावे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.