पहिली बायको असताना केले दुसरे लग्न ; वडिलांनी केला मुलाचा खून
सातारा : पहिली बायको असताना दुसरे लग्न केल्याच्या रागातून वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केल्याची घटना पिंप्रद (ता. फलटण) येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी गुन्ह्यानंतर दोनच तासांत अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सूरज सिकंदर भोसले (वय 30 रा. पिंप्रद) असे खून झालेल्या मुलाचे असून याप्रकरणी पोलीसांनी सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले (रा. पिंपरद) याला अटक केली आहे.याबाबतची फिर्याद मृत सूरज याची पत्नी दामिनी भोसले (वय 25 रा. पिंप्रद) हिने दिली
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सूरज याने पहिली बायको असतानाही दुसरी बायको येडाबाई हिच्याबरोबर लग्नाची गाठ बांधल्याने त्याचे वडील सिकंदर यांच्या मनात सूरज याच्याविषयी राग होता. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील वडरी आळीतील घरासमोर सिकंदर भोसले याने त्याचा मुलगा सूरज भोसले याच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात व पायावर वार केले. यामध्ये सूरज हा मृत पावला. त्याची पत्नी दामिनी हिस जीवे मारण्याची धमकी दिली.
. याची माहिती मिळताच दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!