प्रवासासाठी बनावट इ-पास बनविणाऱ्या आरोपीला हडपसरमधून अटक

पुणे : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्य सरकारच्या Covid-19Mhapolice.gov.in वेबसाईटवरून नागरिकांना  बनावट ई-पास तयार करून देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या एकाला सामाजिक सुरक्षा विभाग व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ (गुन्हे शाखा) यांनी अटक केली आहे.

धनाजी मुरलीधर गंगनमले (वय-२९ वर्षे, रा. विश्वसृष्टी सोसा. भेकाराई नगर, पापडे वस्ती, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसह महत्वाच्या कामांमध्ये प्रवास करताना अडथळा निर्माण होउ नये, यासाठी शासनाने इ-पास बंधनकारक केला आहे. परराज्यासह दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांच्या वेबसाईटवर फॉर्म भरून इ-पास मिळविल्यानंतरच प्रवासाला परवानगी देण्यात येत आहेे. द

रम्यान,२८ एप्रिलला पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीधर खडके यांना हडपसर परिसरात धनाजी गंगनमले हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता Covid-19Mhapolice.gov.in या वेबसाईटवरून बनावट ई-पास तयार करून नागरिकांना त्याची विक्री करीत असल्याची बातमी मिळाली.

त्यानुसार त्यांनी भेकराईनगरमधील विश्वसृष्टी सोसायटीतील तरूणाच्या घरी छापा टाकला. त्यावेळी धनाजी गंगनमले हा त्याच्या मोबाईल व लॅपटॉपवरून Covid-19Mhapolice.gov.in या वेबसाईटवर नागरिकांचे फॉर्म भरून, त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करून महाराष्ट्र शासनाची व ई-पास धारक नागरिकाची फसवणूक करीत असल्याचे दिसून आले. बनावट ई-पास तयार करून तो खरा असल्याचे दाखविण्यासाठी त्याने पोलिसांच्या लोगोचा वापर करून ई-पासची विक्री केली आहे.म्हणून त्याच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त रवींद शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-१ चे सहा. पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या (अतिरिक्त कार्यभार) सामाजिक सुरक्षा विभाग व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१च्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सहा. पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पोलीस नाईक इरफान पठाण, महिला पोलीस नाईक नीलम शिंदे, पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण, पोलीस नाईक मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.