इएफओ अर्थमंत्रालय दिल्लीतून बोलत असल्याची बतावणी करून 5 लाखांची फसवणूक, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : इएफओ अर्थमंत्रालय दिल्लीतून बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने तरूणाला त्यांच्या वडिलांच्या इन्शुरन्सचे 3 लाख 40 हजार रूपये मिळणार असल्याचे सांगून तब्बल 5 लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे.

या प्रकरणी 43 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्ती एका खासगी कंपनीत कामाला आहे. 22 ते 28 जानेवारी दरम्यान एका सायबर चोरट्याने तरूणाला फोन करून इएफओ अर्थमंत्रालय दिल्लीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या वडिलांचे ग्रुप इन्शुरन्सचे 3 लाख 40 हजार रूपये मिळणार असल्याची बतावणी त्याने केली. त्यानुसार सायबर चोरट्याने तरूणाला वेळोवेळी संपर्क करून ऑनलाईनरित्या 4 लाख 75 हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.