दु:खद बातमी! मराठमोळा बाॅडीबिल्डर मिस्टर इंडिया जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन, 34 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बडोदा : करोना संसर्गामुळे अनेकांना अवेळी जगाचा निरोप घ्यावा लागत आहे. अशातच मराठमोळे बाॅडीबिल्डर जगदीश लाड यांचे करोनामुळे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अवघ्या 34 व्या वर्षी त्यांनी बडोद्यात अखेरचा श्वास घेतला.आपल्या बॉडिबिल्डींग करिअरमध्ये जगदीश यांनी भारत श्री खिताबही पटकावला होता.
जगदीश लाड हे काही वर्षांपूर्वीच नवी मुंबईहून वडोदरा येथे स्थायिक झाले. वडोदरा येथे त्यांनी बॉडीबिल्डींगची नवी सुरूवात केली. शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड हे मुळचे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा होते. नवी मुंबईहून लाड हे वडोदरा येथे स्थायिक झाले होते. वडोदरा येथे त्यांनी स्वतःची व्यायामशाळा सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. अखेर त्यांचे निधन झाले.
जगदीश लाड यांनी कमी वयातच बाॅडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्यांनी नवी मुंबई महापौर श्री चा किताब जिंकला होता. चार वेळा महाराष्ट्र श्री सुवर्णपदक, तसेच मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवले होते.
त्यांच्या निधनावर महाराष्ट्र बाॅडिबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दु:ख व्यक्त केले आहे. एक नावाजलेला मराठमोळा बाॅडिबिल्डर अवेळी गेल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!