परीक्षेचा ताण आल्याने १८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद : बी फार्मसीची सध्या सुरु असलेल्या परीक्षेच्या ताणात निराश झालेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार औरंगपुरा परिसरातल्या श्रीरंग बिल्डिंग मध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.
कीर्ती उदय जोशी (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.तरुणीने सुसाईड नोट लिहून ठेवली असून आपल्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे
औरंगपुरा येथील कीर्ती ही बी फार्मसीची तयारी करत होती. परीक्षेच्या अभ्यासाचा तिला ताण आल्याने, ती नैराश्यात होती. आज सकाळी आकाराच्या दरम्यान ती नेहमी प्रमाणे अभ्यास करण्यासाठी खोली मध्ये गेली. दररोज तीन ते साडेतीन पर्यंत अभ्यास करण्याचा तिचा नित्यक्रम होता. परंतु, संध्याकाळी सहा वाजले तरी ती खोलीच्या बाहेर का आली नाही म्हणून, कुटुंबीयांनी तिला फोन केला. कीर्तीने फोनवर प्रतिसाद न दिल्यामुळे, तसेच दरवाजा उघडत नसल्याने. तिच्या भावाने शेजारील रूमच्या खोलीतून डोकावले असता.
त्यावेळी तिने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेतला याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात नोंद करण्यात आली आहे.तिने तीन पानाची सुसाईड नोट मृत्युपूर्वी लिहून ठेवली असून, आपण परीक्षेत यशस्वी होऊ शकलो नाही म्हणून आत्महत्या करत आहे. आपल्या मृत्यूस कुणाला जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!