बंदिस्त जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राहत्या घरामध्ये बंदिस्त जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. त्यात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 14 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) दुपारीी अत्तार वीटभट्टी, दापोडी येथे करण्यात आली
मंगेश सिताराम नवघणे (वय 44, रा. अत्तार विटभट्टी, दापोडी, पुणे) आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मधील अत्तार विटभट्टी येथील मंगेश नवघणे याच्या घरामध्ये आर्थिक फायद्यासाठी पैशावर रम्मी नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.त्यानुसार गुरुवारी दुपारी पाच वाजता पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 14 हजार 270 रुपये रोख रक्कम आणि 40 रुपयांचे रम्मी जुगाराचे साहित्य असा एकूण 14 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, प्रणिल चौगले, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, गणेश कारोटे, राजेश कोकाटे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!