मदनवाडी येथे रक्तदान शिबिरात 43 बाटल्यांचे संकलन;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त

 

भिगवण( नारायण मोरे) :राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी मदनवाडी चौफुला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 43 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि शिवशंभू चॅरिटेबल ट्रष्ट यांच्या विध्यमानाने आयोजित सतीश शिंगाडे (श्रीनाथ म्हास्कोबानाथ शिक्षण संस्था मदनवाडी) यांच्या माध्यमातून पार पडला.

रक्त हे निसर्गनिर्मित आहे त्याची कोणत्याही प्रकारे निर्मिती करता येत नाही, ते फक्त मानवी शरीरातच निर्मित होते. हे खूप अमूल्य मानले जात. जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान करण्यास हातभार लावण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं, या आवाहनाला 43 दात्यांनी प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र येणाऱ्या काळात युवकांना लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याने 58 दिवस रक्तदान करता येणार नसल्याने रक्ताचा तुटवडा जाणवणार असल्याने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शिंगाडे यांनी बोलताना सांगितले तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या वेळी खूप अडचणी येतात आणि या अडचणींना सामोरे जाव लागत असत, पुढील कोरोना काळात कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी रक्ताची गरज लागली तर गरजूंना रक्तपुरवठा केला जाईल असे सतीश शिंगाडे (अध्यक्ष ,म्हास्कोबानाथ श्रीनाथ शिक्षण संस्था मदनवाडी) यांनी सांगितले.

यावेळी श्रीराज भरणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. उपस्थित अनिकेत भरणे ,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सचिन बोगवत ,धनाजी थोरात ,विष्णुपंत देवकाते ,सतीश बंडगर,शरद चितारे, संजय बंडगर ,संजय शिंदे तसेच यशस्वीपणे कार्यक्रमासाठी शिवशंभू चॅरिटेबल ट्रष्ट चे सदस्य किशोर फलके ,पिंटू गुरगुळे ,पत्रकार निलेश गायकवाड ,दिनेश शिंदे ,मनसु शिंदे,दीपक शिंदे,विठ्ठल दगडे ,विशाल गुरगुळे इत्यादी

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.