कंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या ३ जणांना अटक
पिंपरी चिंचवड : कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत भर रस्त्यात त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी खेड तालुक्यातील म्हाळुगे गावात घडली. या गुन्ह्यातील तीन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश उर्फ गण्या रवी घरमाळे (वय २०, रा. तुपे आळी, म्हाळुंगे इंगळे, ता. खेड), ऋषिकेश उर्फ गोट्या सुनील भालेराव (वय २०, रा. बौद्धवाडा, भीम नगर, म्हाळुंगे इंगळे, त. खेड), अभिषेक बुध्दसेन पांडे (वय १८, रा. पवारवाडी खालूंब्रे, ता. खेड, मूळ रा. मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
अतुल तानाजी भोसले असे खूनी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अक्षय पंडित बो-हाडे (वय 26 रा. म्हाळुगे, ता.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अतुल भोसले यांचा कंपनीत पाणी सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. पाण्याचे टँकर पुरवण्याच्या कारणावरून अतुल भोसले आणि आरोपी अक्षय शिवले या दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. या वादातून म्हाळुंगे येथे चाकण तळेगाव रस्त्यालगत अतुल तानाजी भोसले यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. खून प्रकरणातील आरोपी भोसरी स्मशान भूमी जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
सदर कामगीरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-१, मंचक इप्पर , सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सागर कवडेे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे , पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सिध्देश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समिर रासकर व संतोष महाडिक यांनी सदरची कामगिरी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!