पिंपरी चिंचवडमध्य बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा दुचाकीस्वाराने फरफटले ; घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

पिंपरी चिंचवड :नाकाबंदी दरम्यान चौकशीसाठी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला असता त्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला 50 फूट फरफटत नेले.ही घटना वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (दि.28) रात्री साडे सातच्या सुमारास घडली.या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी  दुचाकी चालकाला अटक करण्यात आली आहे.

संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. मु पो आढाले, खुर्द, ता. मावळ) याला अटक केली आहे.याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस हवालदार शंकर तुकाराम इंगळे (वय ४७) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस हवालदार शंकर तुकाराम इंगळे आपल्या सहकाऱ्यांसह वाकड हिंजवडी रोडवर नाकाबंदीच्या कर्तव्यावर होते. त्यांनी संजय याला गाडी बाजूला घेऊन त्याच्याकडे गाडीचे लायसन्स, कागदपत्रेबाबत विचारणा केली. तेव्हा ते धक्का देऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या मागील बाजूस फायबरचे कॅरिअरला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंगळे यांचा हात अडकला. त्यांनी त्यास थांब थांब म्हणाले. तरीही स्कुटीचालकाने गाडी न थांबविता त्यांना ५० फुट अंतरापर्यंत ओढत फरफटत नेले. त्यामुळे फिर्यादीचे डावे पायाचे गुढग्याला, उजव्या पायाचे टाचेला मार लागून कपडे फाटले व दुखापत झाली. पोलिसांनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.