हायवेवर लुटमार करणाऱ्या दोघांना अटक,गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलिसांची कामगिरी

पुणे : हायवेवर लुटमार करणाऱ्या दोन गुन्हेगाराना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलिसांनी अटक केली आहे.आकाश उर्फ आक्या दयानंद गायकवाड (वय २२ रा. उरुळी देवाची ता.हवेली), ओमकार उर्फ बंटी सुनिल बहुले (वय २४ रा. उरुळी देवाची) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे,अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, तसेच शरीर व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणे याबाबत आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत.

गुन्हे शाखा युनिट पाच कडील अधिकारी व कर्मचारी हे रोडवर होणा-या लुटमारीच्या अनुषंगाने प्रतिबंध करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना युनिट ५ कडील पो.हवा महेश वाघमारे व पो.हवा अश्रुबा मोराळे यांना गोपनिय माहीती मिळाली की, रोडवर अडवणुक करुन लुटमार करणारे दोन इसम हडपसर द्राक्ष संशोधन केंद्राजवळ उभे आहेत अशी माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी रोडवर लोकांना अडवुन लुटमार केल्याचे कबुल केले.

आरोपीकडून दोन मोबाईल फोन, मनगटी घडयाळ, एक मोटार सायकल व रोख रक्कम असा एकुण १ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त  अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे २) लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली
युनिट-५ चे वपोनि हेमंत पाटील यांचे सुचनेनुसार सपोनि संतोष तासगावकर, सपोनि प्रसाद लोणारे, पोहवा महेश वाघमारे, पोहवा अश्रुबा मोराळे, पोहवा अजय गायकवाड, पोहवा चेतन चव्हाण, पोहवा रमेश साबळे, पो.ना अमरचंद्र उगले, पो.ना दयाराम शेगर, पो.शि संजय दळवी, या पथकाने केली आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.