पुण्यात सलून, स्पा, जिम बंद राहणार !

पुणे : राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत  वाढवला असला, तरी अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जिथे रुग्णसंख्या घटत आहेत, तिथे सूट देण्यात आली आहे, तर जिथे रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात नाही, तिथले निर्बंध अजूनही कायम आहेत. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये  आजपासून मोठ्या प्रमाणात शिथीलता देण्यात येतेय. आजपासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र पुण्यातील सलून, स्पा, जिम बंद राहणार बंद राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यानी ट्विट करत ही माहिती दिली

पुणे मनपा हद्दीत आपण  शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यानी दिली आहे.

 

पुण्यात काय सुरु राहणार?

१. सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार

२. शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार

३. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक १४ एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.

४. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील

५. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

६. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.

७. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा  सुरु करणेस मुभा राहील.

पुण्यात काय बंद असणार?

१. पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार

२. शनिवार आणि रविवार सकाळी ७ ते २ यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार.

३. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.