भावकीत शेतीच्या वादातून २० वर्षीय तरुणाचा खून, 13 जणांवर गुन्हा दाखल ; शिरुर तालुक्यातील घटना
पुणे : शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे भावकीत शेतीच्या वादातून १३ जणांच्या टोळक्याने आपल्याच नातेवाईकांवर हल्ला करुन त्यात तरुणाचा कुर्हाडीने वार करुन खुन केला. तर इतर पाच जणांवर हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना त्यांच्या शेतात सोमवारी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी १३ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न, दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
रवींद्र तुकाराम माळवदे (वय २०, रा. माळवदेवस्ती, कवठे यमाई) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बाबाजी विट्ठल बगाटे, योगिता रवींद्र माळवदे, बबुबाई मथू माळवदे, मथू खंडू माळवदे, आकाश बाबूराव माळवदे, शोभा बाबाजी बगाटे, तुकाराम खंडू माळवदे हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
पांडुरंग बारकु माळवदे, बाबुराव दत्तु माळवदे, फक्कड दत्तु माळवदे, अभिजीत फक्कड माळवदे, लहु बाबुराव माळवदे, अंकुश बाबुराव माळवदे, शोभा फक्कड माळवदे, सुदाम लक्ष्मण माळवदे, ताईबाई लक्ष्मण माळवदे, पाटील लक्ष्मण माळवदे, वर्षा पाटील माळवदे, हिराबाई बारकु माळवदे, बारकु दत्तु माळवदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी तुकाराम खंडु माळवदे (वय ५०, रा. माळवदे वस्ती, कवठे येमाई, शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,माळवदे यांच्या भावकीत शेतीचा वाद आहे. या वादाचा राग मनात धरुन आरोपी हे हातात कुर्हाडी व इतर हत्यारे घेऊन तुकाराम माळवदे यांच्या शेतात आले. त्यांनी हातातील कुर्हाड फिर्यादी यांच्या मानेवर मारत असताना त्यांचे मेव्हण्याने हात मध्ये घालून अडविल्याने त्यात ते जखमी झाले. त्यावेळी आरोपींनी रवींद्र माळवदे याच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून त्याला ठार मारले. तर, रवींद्रची पत्नी योगीताच्या डोक्यावर, फक्कड दत्तू माळवदे ने कुऱ्हाडीने वार केला. भावजय बबूबाई मथु माळवदे हिच्यावर लहू व अंकुश माळवदे या दोघांनी लाकडी दांडक्याने मारले. माझा भाऊ मथु खंडू माळवदे यांच्यावर, पांडुरंग बारकू माळवदे याने डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. पुतण्या आकाश बाबुराव माळवदे याच्यावर अभिजित फक्कड माळवदे याने कुऱ्हाडीने वार केले तर, त्याच्यावरच सुदाम लक्ष्मण माळवदे व अंकुश बाबुराव माळवदे या दोघांनी लाकडी दांडक्यांनी मारले. माझी बहिण शोभा बाबाजी बगाटे हिस अभिजित फक्कड माळवदे याने कुऱ्हाडीने तर ताईबाई लक्ष्मण माळवदे, वर्षा पाटील माळवदे व पाटील लक्ष्मण माळवदे या तिघांनी लाकडी दांडक्यांनी मारले. असे फिर्यादीत तुकाराम खंडू माळवदे यांनी सांगितलेय. तर, त्यांनी पुढे असेही सांगीतलेय की, मला स्वतःला बाबुराव दत्तू माळवदे याने कुऱ्हाडीने मारले, तर शोभा फक्कड माळवदे, हिराबाई बारकू माळवदे व बाबु दत्तू माळवदे या सर्वांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केलीय. त्यामुळे पांडुरंग माळवदे व बाकीच्यांनी संगनमताने, माझ्या मुलाला ठार केलेय व आमच्या सर्वांना ठार मारण्याचा उद्देशाने खुनी हल्ला व मारहाण केली.”
त्यामुळे या सर्व हल्लेखोरांविरुद्ध, मयत रवींद्र माळवदे चे वडील तुकाराम खंडू माळवदे यांनी, १३ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!