सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; 5 दिवस आधीच आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह

पिंपरी चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता. ज्यामध्ये आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी कोरोना विरोधातील नियमांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट दिसत होते. त्यामुळे  सोशल मीडियावरमहेश लांडगे ट्रोल झाले होते.त्यामुळे लग्नाची नियोजित तारीख लांब असतानाच आळंदीत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत महेश लांडगे यांची कन्या साक्षी लांडगे आणि उद्योजक नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद यांचा विवाह अत्यंत साधेपणाने सोमवारी पार पडला. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी साठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी आणि रावेत येथील नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद याांचा विवाह येत्या सहा जूनला करण्याचे नियोजन केले होते. त्यानिमित्ताने रविवारी भोसरी गावातील लांडगे आळीमध्ये रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास निमित्ताने मांडव डहाळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्या साक्षी हिची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. बैल गाडीचं सारथ्य चुलते सचिन लांडगे करीत होते. बैलगाडी घराजवळ आली असताना कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली.  तसेच हलगी वादन सुरू झाले. यावेळी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हलगीच्या तालावर कार्यकर्त्याबरोबर ताल धरला. यावेळी उपस्थितांनीही आनंदात सहभाग घेतला.

यासंदर्भातील व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका केली जात होती. दुपारी व्हायरल झालेल्या या व्हिडीओंच्या आधारे आमदार  लांडगे त्यांचे भाऊ सचिन लांडगे, नगर सेवक आणि सुमारे 60 कार्यकर्त्यांविरुद्ध कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झाल्या प्रकरणाची चर्चा सुरू होते न होते तोच लांडगे यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान हा विवाह सोहळा ६ जून राजस्थान किंवा गोवा येथे होणार होता. मात्र, लॉकडाउन वाढविल्याने सोमवारी सकाळीच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर दर्शन घेऊन घरातील लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मुलाचे लग्न २५ व्यक्तींच्या मर्यादेत उरकणे कठीण होते. त्यामुळे आज हा सोहळा नोंदणी पद्धतीने विवाह करून केवळ आठ जणांच्या उपस्थितीत पार पाडल्याचे कार्तिक म्हणाले. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्याकडून मांडव डहाळे कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात घडलेल्या चुकीची उपरती आल्यानेच त्यांनी आपल्या मुलीचा विवाह तडकाफडकी उरकला असल्याची चर्चा सध्या शहरात पसरली आहे.

आपल्या मुलीच्या लग्न समारंभातील मांडव डहाळ्याचा कार्यक्रमात महेश लांडगे आणि त्याच्या समर्थकांनी हळद उधळत भंडाऱ्यात नाहून नृत्य केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला होणार आहे. त्यापूर्वीच्या मांडव डहाळ्याचा कार्यक्रम पार पडला होता. या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरताना या व्हिडीओत दिसत आहेत. तर सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे पायमल्ली या कार्यक्रमात करण्यात आली आहे. मांडव डहाळ्याचा कार्यक्रमासाठी वाजंत्री, बैलजोड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.