हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ,पतीसह सासू- सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड :  पाच लाख रुपये हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर तिला उपाशीपोटी ठेवून मारहाणही केली. हिमाचल प्रदेश, विशाखापट्टणम व संत तुकाराम नगर, पिंपरी येथे ८ मार्च २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही घटना घडली.याप्रकरणी पतीसह सासू- सासऱ्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अनिष होसियारसिंग चौहाण (वय ३१), सासरे होसियारसिंग चौहाण (वय ६०), सासु बसलानदेवी होसियारसिंग चौहाण (वय ५५, रा. विशाखापट्टणम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महीलेने पिंपरी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेला पाच लाख रुपये हुंड्यासाठी घालून पाडून बोलून हाताने मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. तिला वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे जगू दिले नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.