जुन्या भांडणाच्या रागातून २१ वर्षीय तरुणाला कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न
पिंपरी चिंचवड : जुन्या भांडणाच्या रागातून २१ वर्षीय तरुणाला कोयत्याने शरीर व चेह-यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. मोशी परिसरात सोमवारी (दि.३१) रात्री साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल बोराटे (रा. भारतमाता चौक, मोशी) व सूरज महाजन (रा. बनकर वस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी सौरभ ज्ञानेश्वर गायकवाड (वय २१ रा. भारतमाता चौक, मोशी) यांनी मंगळवारी (दि.१) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गायकवाड आणि हर्षल बोराडे यांच्यात फेब्रुवारीमध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून बोराडेने त्याच्यावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला आहे. तसेच, शिवीगाळ करत ‘तुला खल्लास करुन टाकतो’ अशी धमकी दिली व गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!