पत्रिका जुळत नसल्याचे सांगून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ,पतीसह ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पतीच्या पत्रिकेशी पत्रिका जुळत नसल्याचे सांगून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही.घटना ८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२१.या कालावधीत रहाटणी येथे घडली,
याप्रकरणी  पतीसह ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती स्वप्निल राजेंद्र कदम (वय २८), सासू ललिता राजेंद्र कदम (५५), सासरा राजेंद्र काशिनाथ कदम (६५), दीर सागर राजेंद्र कदम (३३, सर्व.रा. रहाटणी), नणंद कामिनी गोविंद वाळुजकर (३५), नंदावा गोविंद शंकर वाळुजकर (४०, दोघेही रा. पिंपरी.गाव), पतीचे मामा नागेश रंभाजी मगर.(६५, रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि. ३१) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी आपसांत संगनमत करून विवाहितेला माहेरून बॉशिंग मशीन, कपाट व ५० हजार रुपये.आणण्यास सांगितले. विवाहितेच्या घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी विवाहितेला वारंवार टोमणे मारून मानसिक त्रास दिला. तसेच, विवाहिता व तिच्या पतीची पत्रिका जुळत नसल्याने तुम्ही दोघे एकत्र राहीला तर  पतीच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगुन वारंवार वाद घालुन विवाहितेचा मानसिक छळ केला,असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक जगताप तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.