पुण्यात संशयावरून पत्नीचा निर्घृण खून, पतीची आत्महत्या

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला व नंतर स्वत:ही  गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिराजी नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री घडली.

उषा योगेश गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर योगेश तानाजी गायकवाड (वय 33) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि योगेश यांचा 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 10 आणि 8 वर्षाची दोन मुले आहेत. उषा घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवात होती. योगेश काहीही काम नसल्यामुळे घरीच बसून होता. दरम्यान, योगेश हा सारखा पत्नी उषाच्या चारित्र्यवर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.

सोमवारी रात्री त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. रात्री मुले झोपल्यानंतर योगेश गायकवाड यांनी गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मुले जेव्हा झोपेतून उठली तेव्हा त्यांना वडील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले तसेच आई निपचित पडली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.