“माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ, म्हणून मीच होतो दुनियेतून ऑफ”,असे स्टेटस ठेवून 29 तरुणाची आत्महत्या

जळगाव :जळगाव मधील अयोध्या नगरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.हर्षल प्रेमनाथ महाजन (वय २९) असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपुर्वी हर्षलने ‘माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ होतो म्हणून मीच स्वत:च दुनियेतून ऑफ होतो’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल हा जैन कंपनीत कामाला होता.आयोध्या नगरातील सद्गुरु नगरात तृप्ती कॉर्नर जवळ आई-वडील यांच्यासह वास्तव्याला होता. दोन महिन्यापूर्वी त्याचे लग्न झालेले होते. काही दिवसांपूर्वी  पत्नीशी भांडण झाले, त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली, त्या दिवसापासून तो नैराश्यात होता.

मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर आई, वडील पुढच्या खोलीत झोपले तर हर्षल मागच्या खोलीत जाऊन झोपला होता. सकाळी आई उठून हर्षल याला उठवायला गेल्या असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.  हे द्रुष्य पाहून आई, वडीलांना मोठा धक्का बसला.त्यांनी प्रचंड आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हेमंत कळसकर व चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान, कळसकर यांनी हर्षलचा मोबाईल तपासला असता त्यात स्टेटस ठेवलेले आढळले. सुसाईड नोट वगैरे काही आढळली नाही, त्यामुळे त्याने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झालेले नाही.

हर्षल याने पहाटे २.२२ वाजता मोबाईलमध्ये स्टेटस ठेवले. त्यात त्याने म्हटले आहे की, माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले. काहींच्या डोक्यात आणि मित्र परिवार छान लाभले. माझे आई-वडील दुनियेतील खूप छान देवमाणूस आहे.पुढचा जन्म त्यांच्या पोटी जन्माला येवो ही प्रार्थना देवाला करतो.आणि कोणाला मी या गोष्टीला जिम्मेदार नाही समजत.आणि कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो,मला माफ करा. असे स्टेटस त्याने ठेवले अन् गळफास घेतला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.