व्हॉट्सअप नंबरवरुन अश्लील मॅसेजेस व अश्लील व्हिडीओ कॉलींग करून महिलेचा विनयभंग, आरोपी अटकेत ; पिंपरी चिंचवड मधील घटना

पिंपरी चिंचवड : व्हॉट्सअपवरुन अश्लील व्हिडीओ दाखवुन महीलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला वाकड पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.सम्पत राम ( रा. मेघवालो की बस्ती, गांव बारना, तहसील भिलाडा, जि. जोधपुर, राजस्थान सध्या- के/ऑफ सुभाष पॅनकार्ड क्लबरोड,चहाचे दुकान, रामदेव सुपरमार्केट जवळ, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एका महीलेस दोन वेगवेगळया व्हॉट्सअप नंबरवरुन अश्लील मॅसेजेस व अश्लील व्हिडीओ कॉलींग करुन तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा वाकडं पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गुन्हयाची दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

सदर गुन्हा दाखल होताच  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी तात्काळ गुन्हयाचे तपासाबाबत सुचना देवुन गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील यांचेकडे दिला त्याप्रमाणे आरोपीने गुन्हयासाठी वापरलेले मोबाईल नंबर ७५५९२५२३५० व ९०७९२६३६७८ यांची तांत्रिक माहीती घेवुन पोलीस निरीक्षक गुन्हे
संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे-२  सुनिल टोणपे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक. एस. एम. पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तांत्रिक व कौशल्यपुर्वक तपास करुन सापळा रचुन आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीकडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेले दोन मोबाईल व ७५५९२५२३५० व ९०७९२६३६७८ मोबाईल नंबरचे सिमकार्ड व इतर तीन मो. सिमकार्ड ८४८५८५४३४३,७८९१८८१०४७८, ९६७३९६२३८५ जप्त करण्यात आलेले आहेत.

आरोपी याचे चहाचे दुकान होते त्याच्याकडे येणाऱ्या गरीब लेवर त्याच्याकडे मोबाईल चार्जिगला लावुन कामास जात असायचे त्यापैकी साधे मोबाईल ज्यामध्ये व्हॉट्सअप नसते अशा मोबाईल नंबरचे व्हॉट्सअप त्याचे स्वतःचे मोवाईलमध्ये चोरुन घेवुन त्यावरुन तो गुन्हे करीत होता. तसेच तो पुर्वी फर्निचरचे दुकानात काम करीत होता त्यावेळी दुकानात आलेल्या कस्टमरचे नंबर त्याने स्वतःकडे ठेवलेले होते त्या नंबरवर तो अशा प्रकारे कॉलींग करुन त्यांना त्रास देत असायचा. त्याने फिर्यादी महीलेप्रमाणेच इतर काही महीलांनाही अशा प्रकारे अश्लील मेंसेजेस व अश्लील व्हिडीओ कॉल करुन त्रास दिला असण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,वरील नंबरवरुन कोणाला अशा प्रकारे अश्लील मॅसेजेस, अश्लील व्हिडीओ कॉल करुन त्रास दिला असल्यास त्यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.