शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे भरदिवसा गोळ्या घालून हत्या केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मास्टरमाइंड नितीन गावडे व त्याचे दोन साथीदाराना अटक
शिक्रापुर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे १८ जानेवारी रोजी भरदिवसा स्वप्निल रणसिंग या तरुणाची गोळ्या घालून हत्या केलेल्या खुनातील प्रमुख आरोपी मास्टर माइंड नट्या उर्फ नितिन गिताराम गावडे व त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
नितीन उर्फ नटया सिताराम गावडे (वय ३० वर्षे रा.टाकळी हाजी, ता. शिरूर,जि.पुणे ) मोहन उर्फ पिंटु भाउ चोरे (वय ३३ वर्षे रा.डोंगरगण ता शिरूर जि पुणे) सुनिल अशोक सुंटले (वय ३६ वर्षे रा टाकळी हाजी ता शिरूर जि पुणे) या तिघांना शिरूर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे.आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींना १२ जून रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात कोयत्या ऊर्फ विजय गोविंद शेंडगे, बबलू खंडू माशेरे (दोघे राहणार आमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे) या दोघांना या आधी अटक करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी सर्कल ऑफिस जवळ स्वप्नील रनसिंग या तरुणाची दोघा जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती.हा हल्ला करणारे कोयत्या ऊर्फ विजय गोविंद शेंडगे, बबलू खंडू माशेरे माइंड नट्या उर्फ नितीन गिताराम गावडे व त्याचे दोन साथीदार मात्र फरार होते. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके पाठवली होती परंतु हे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते.
शिरूर पोलीस स्टेशन ला गुन्हयातील पाहीजे असलेले नितीन गावडे, मोहन चोरे, सुनिल अशोक सुंटले हे आरोपी सदरचा गुन्हा घडल्यापासुन फरार झालेले होते व ते अटकेपासुन जाणुन बुजुन लपुन बसलेले होते. सदर आरोपिविरूध्द प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी शिरूर यांचे आदेश झाले होते. त्या आदेशाचे सुध्दा आरोपींनी पालन न करता सदर आदेशाचा अवमान केला आहे.सदर आरोपींचा शोध घेणेकामी शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथके रवाना केलेली होती. १जून रोजी पोलिसांना गोपनीय महिती मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, करणसिंग जारवाल,पो.कॉ नाथसाहेब जगताप व इतर पोलीस पथकाने न्हावरा फाटा परिसरात सापळा रचुन सदर आरोपींना ताब्यात घेतले.या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!