सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून आणि डोक्यात वारकरून खून झाल्याचे उघड

पुणे :  सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळला आहे. तपासात त्याचा गळादाबून आणि डोक्यात वारकरून खून झाल्याचे उघड झाले आहे. सिंहगड रोड परिसरातत ही घटना घडली आहे.

कृष्णकुमार प्रसाद (वय: २८, रा अभिनव कॉलेज जवळ, नऱ्हे, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कृष्णकुमार हा सेन्ट्रीगचे कामे करत होता. तो राहण्यास सिंहगड परिसरात होता. त्याचा विवाह झालेला नाही. पण, तो लिव्हइनमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारपासून कृष्णकुमार बेपत्ता होता. दरम्यान कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सोमवारी सायंकाळी नऱ्हे येथील अभिनव कॉलेजजवळ शिवनेरी बी. नवीन बांधकाम साईड सुरू आहे. येथील पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस यांना कॉलकरून माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शववि्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला. दरम्यान मंगळवारी शववि्छेदनाचा अहवाल आला त्यात डॉक्टरांनी डोक्याला मार आणि गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.