आता मिळवा ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज,SBI बँक देणार कोरोनाग्रस्तांना कोविड पर्सनल लोन तेही कोणत्याही सिक्योरिटी शिवाय

नवी दिल्ली; देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank of India) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे. या सुविधे अंतर्गत ग्राहकांना खुप कमी दरामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळू शकेल. देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.

इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते पगारदार, पगार नसणारे आणि निवृत्तीवेतनधारकांना कोरोना उपचारांसाठी २५ हजार ते ५ लाख रुपयां पर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकेल.

बँकेने या कर्ज सेवेला कोविड पर्सनल लोन (Covid Personal Loan) असे नाव दिले असुन, या कर्जाची विशेष बाब म्हणजे याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिक्योरिटी देण्याची आवश्यकता लागणार नाही.

बँक ग्राहकांना हे कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी मिळणार असुन, या कर्जावर तुम्हाला ८.५ टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. शिवाय, अनसिक्योर्ड वैयक्तिक कर्जाचे दर १० ते १६ टक्क्यांपर्यंत आहेत.

एसबीआय प्रमुख दिनेश खारा आणि इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन राज किरण राय यांची महत्त्वाच्या बैठकीतून हा निर्णय घेण्यात आला.

कोविड पर्सनल लोनला पब्लिक सेक्टर बँकांच्या बोर्डाकडून याआधीच मंजुरी मिळाली आहे. हे कर्ज पगारदार आणि पगार नसरणाऱ्या अशा दोन्ही गटातील व्यक्तींना मिळणार आहे.

तुम्ही हॉस्पिटल बिल बँकेमध्ये दाखवून हे कर्ज घेऊ शकता. तुमच्या पेमेंटची स्थिती आणि क्षमता लक्षात घेऊन बँक तुम्हाला कर्ज देईल. या व्यतिरिक्त तुम्ही कोरोना रूग्णाच्या उपचार खर्चाची अंदाजे रक्कम देऊनही या सुविधेचा लाभ घेऊ शकता, जी बँकेत घेऊन जावी लागेल आणि कर्जासाठी अर्ज करावा लागेल.

या सुविधे मध्ये बँक २५ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकतात. तसेच कर्जासाठी मान्यता आणि ते नाकारण्याचा अधिकार बँकेकडे असणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.