गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल,६.३३ मुद्देमाल जप्त ; चाकण पोलीसाची कामगिरी

पिंपरी चिंचवड : गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी एका विरूध्द चाकण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ६ लाख ३३ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चाकण पोलिसांनी  बुधवारी (दि.2) ही कारवाई केली.

याबाबत प्रकाश गोविंदजी नगदा (वय 48, रा. रोहकल रोड, ग्रिन ईस्टेट चाकण ता. खेड जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव चौकात शिकापुर चाकण रोडवरून प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जाणार असल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली. शिक्रापूर बाजूकडून एक पिकअप गाडी (एम एच 14 / जे एल 1468) आली.पोलिसांनी तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला व व्हि-9 कंपनीची तंबाखु असा 33 हजार 880 रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा आणि सहा लाख रुपयांचे वाहन असा एकूण 6 लाख 33 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.