आता कोरोना अॅडव्हान्स पुन्हा काढू शकणार,EPFO च्या ६ कोटी खातेधारकांसाठी मोठा दिलासा
ईपीएफ खतेधरकाना दुसऱ्यांदा कोरोना अॅडव्हान्स नॉन रिफंडेबल योजनेचा लाभ मिळणार आहे.बहुतांश राज्यांत मे महिना हा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढविला आहे, तर काहींनी निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार बुडण्याबरोबरच कोरोना उपचाराचे मोठे संकट कोसळले आहे. यामुळे EPFO च्या या योजनेनुसार गेल्या वेळसारखाच परत न करण्यासाठी पीएफ अॅडव्हान्स काढता येणार आहे.
कोरोना संकटासाठी तुम्ही पीएफ मधून पैसे काढले तर ते तुम्हाला परत करायची गरज नाहीय. या योजनेनुसार पीएफ खातेधारक पीएफ खात्यात जमा रकमेच्या ७५ टक्के किंवा ३ महिन्यांची बेसिक सॅलरी (बेसिक आणि डीए) एवढी रक्कम जी कमी असेल ती काढू शकणार आहात.
कामगार मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. यानुसार पीएफ धारक दुसरी नॉन रिफंडेबल कोविड-१९ अॅडव्हान्स (Covid-19 advance) काढण्यास मंजुरी मिळाली असुन, यानुसार गेल्य़ा वर्षी ज्या खातेधारकांनी कोरोना संकटात खर्च भागविण्यासाठी पैसे काढले होते, ते आता पुन्हा पैसे काढू शकणार आहेत. कोरोना आणि ब्लॅक फंगसचे संकट पाहून मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
ईपीएफओने (EPFO) दिलेल्या या सुविधेचा लाभ कोरोना संकटावेळी अनेकांना झाला आहे. खासकरून ज्यांचा पगार १५०००/- रुपयांपेक्षा कमी होता. आता पर्यंत ७६.३१ लाख कर्मचाऱ्यांनी कोरोना नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स घेतला आहे. त्यांना १८,६९८,१५/-कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे तीन दिवसांच्या आत खातेधारकाला दिले जात होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!