कौटुंबिक वादातून दगडाने ठेचून मावस भावाची हत्या, नागपूर हादरले

नागपूर :  कौटुंबिक वादातून एकाने आपल्याच मावस भावाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या  हद्दीतील एमआयडीसी परिसरात एफ्कॉन कंपनीचे पाठीमागे डिफेन्सचे मोकळया जागेत उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा करीत दोन तासांत दोघांना अटक केली आहे. यातील एकजण अल्पवयीन आहे.

अतुल बाबासाहेब लष्कर (वय १७ वर्ष) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बाबासाहेब रामाजी लष्कर (वय ३४ वर्ष रा. वार्ड क्र. ३४, जनसेवा हॉटेल जवळ, निलडोह, नागपूर) यानी फिर्याद दिली आहे.

सतरावर्षीय मारेकरी, त्याचा साथीदार संदीप रमेश सायकाळ (वय २६ वर्ष रा. वानाडोंगरी, नागपूर)या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत अल्पवयीन मारेकऱ्याला ताब्यात घेतले.आरोपींमध्ये एकजण मृत अतुल चा मावस भाऊ आहे. दुसऱ्या आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अतुल दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असताना  एक मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी वाडीतील पीक्स कंपनीमागील मैदानात आढळून आला. त्याच्या डोक्यावर वार केलेल होते. कपड्यांवरुन तो अतुल लष्कर असल्याचे पुढे आले. अतुल एक कॅन्टीनमध्ये कामाला होता. त्याच्यावरही मारहाणीचे गुन्हे दाखल आहे.

अतुलची आई आणि बहीण काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती.त्याबबात अतुल नेहमी मामाला विचारणा करायचा.त्यामुळे अतुलचा  मामा व मावसभाऊ सोबत अनेकदा वाद होत होता. गेल्या महिन्यातही अल्पवयीन मारेकरी व मामाने अतुलच्या घरी जाऊन वाद घातला. अतुलने त्यांना मारहाण केली. अतुल हा आपल्याला ठार मारेल, अशी भीती मावसभावाला होती

बुधवारी आरोपी मामा आणि अल्पवीयने संशयीत आरोपीने अतुलला पिक्स कंपनीच्या पाठीमागे बोलवले. तिथेच अतुल आणि आरोपींचा जोरदार वाद झाला होता.साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून अतुलचीची हत्या केली. काल गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास परिसरातून फिरणाऱ्यांना मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. वाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन तासांत आरोपीं ताब्यात घेतले.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.