देहूरोड परिसरात दारू पिऊन सासूचा विनयभंग; जावयाला अटक

पिपरी चिंचवड : दारू पिऊन आलेल्या जावयाने सासरवाडीत जाऊन धिंगाणा घातला. घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच सासूशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ३) देहूरोड येथे घडली.

राकेश राजेश तेलगु ( वय२५ वर्षे रा एमबी कॅम्प श्रीकृष्णनगर देहुरोड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पीडित सासूने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावयाने दारू पिऊन सासरच्या घराचे गेट तोडले. घरात प्रवेश करून सामानाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी सासूसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना तुमची मुलगी मला आताचे आता द्या, असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली असून अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.