सांगवीत अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक; पोलीस जखमी

पिंपरी चिंचवड : अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हटकले असता चोरट्यांनी गस्तीवरील पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.ही घटना आज (शुक्रवारी, दि. 4) पहाटेच्या सुमारासbसांगवी येथे बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. पोलीस नाईक अमोल लावंड असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी अमोल लावंड आणि कल्याण भोसले सांगवी परिसरात रात्रगस्त घालत होते. दरम्यान, घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही जण अंधारात संशयितरित्या वावरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून आवाज देत त्यांना हटकले.

पोलिसांचा आवाज ऐकताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत पोलीस नाईक लावंड जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांच्या दुचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.