औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची हत्या ; मित्राच्या मदतीनं साडूनेच केला खेळ ‘खल्लास’

औरंगाबाद  : कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधून  समोर आली आहे. शहरातील शहागंज मंडीत शुक्रवारी (दि. 4) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पैशाच्या देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जमीर खान शब्बीर खान उर्फ जम्या (वय 25) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर चोरीचे अन् घरफोडीचे अनेक गंभीर गुन्हे होते. याप्रकरणी सीटी चौक पोलिसांनी मृत जम्याचा साडू शोहेब खानला अटक केली आहे.

सीटी चौक पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार,औरंगाबादमध्ये जमीर खानची कुख्यात गुंड म्हणून दहशत होती. त्याच्या नावावर अनेक प्रकरच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चोरी-घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अनेक वेळा तो अटकेत होता. साडूसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जमीन खान आणि त्याचा साडू यांचा पैशावरुन वाद झाला होता. वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याअगोदरही त्यांच्यात पैशावरुन खटके उडायचे. मात्र त्या त्यावेळी भांडणे मिटायचे. काल मात्र असे काही झाले नाही. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शहाजान मंडीतील जैन धर्मशाळेच्या एका बिल्डिंगजवळ उभा होता. यावेळी जमीरचा साडू शोएब खान एका मित्रासह तिथे आला. त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. वाद इतका विकोपास गेला की, साडू शोएब खानने त्याच्या मित्रासह धारदार शस्त्राने जमीरवर घाव घातले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शोएबने धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोटावर वार केले. जमीर रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर शोएब आणि त्याचा मित्र घटनास्थळावरुन पळून गेले. पण पोलिसांनी काही तासांच्या आतच जमीरचा साडू शोएबला अटक केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.