घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक, मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी
पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपसून फरार असलेल्या आरोपीला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.04) ही कारवाई करण्यात आली.
असिफ ऊर्फ काळया आयुब शेख (वय 29, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी असिफ ऊर्फ काळया हा बैल बाजार मार्केटयार्ड पुणे येथील मोकळया मैदानात आला असल्याची खात्रीशिर बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले चौकशीअंती त्याने व त्याचा साथीदार यांनी मिळून केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्या सुचनेनुसार पोलीस उप-आयुक्त नम्रता पाटील, सहा.पोलीस आयुक्त.राजेंद्र गंलाडे वानवडी विभाग पुणे शहर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निगराणी पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक ६५१२ विशाल वारुळे, पो.ना १७८२ वैभव मोरे,पोलीस शिपाई ७२८९ नितीन जाधव यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!