बांधकाम व्यावसायिकाच्या घरच्यांना ओलीस ठेवत 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांनी अशी केली सिनेस्टाईल सुटका

नागपूर :  नागपुरात एक दरोडेखोर भर दिवसा दुपारी अडीचच्या सुमारास बंदूक आणि चाकू घेऊन एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरात शिरला. त्यांनी घरातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागितली. पण पोलिसांनी अत्यंत चपळपणे सिनेस्टाईल या दरोडेखोरांनाा घातक शस्त्रासह मोठया अटक केली आहे.जितेंद्र तुळशीराम भिसेन (वय १९ वर्षे रा. हुडकेश्वर खुर्द, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

संबंधित घटना ही नागपूरच्या पिपळा फाटा परिसरात घडली आहे. या परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या घरात एक दरोडखोर घुसला. त्याने राजू वैद्य यांच्या कुटुंबियांना ओलील धरलं होतं. पोलिसांनी या आरोपीला मोठ्या शिताफीने आणि सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीला अटक केली. हा थरार नेमका कसा घडला, याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

https://youtube.com/shorts/xZKIGfYtgYM?feature=share

 

राजू वैद्य हे बांधकाम व्यावसायिक आहेत. काल (दि.४) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी बंदूक आणि चाकू घेऊन घरात शिरला. त्याने घरातील वैद्य कुटुंबियांना ओलीस ठेवले आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली.दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हेशाखा, युनिट कमांक ०४, नागपूर शहर पथक वरीष्ठांचे आदेशाने तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळी राजू वैद्य याचे घरासमोर पो.स्टे हुडकेश्वर येथील पोलीस स्टाफ व वरीष्ठ अधिकारी हजर होते. नागपूर शहराचे  पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा (डिटेक्शन)  गजानन राजमाने हे सुध्दा त्वरीत घटनास्थळावर हजर आले.

पोलीस उपायुक्त(डिटेक्शन), गुन्हेशाखा, नागपूर शहर यांनी घटनास्थळाचे अवलोकन केले तसेच पोलीस निरीक्षक भोसले, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि स्वप्नील भुजबळ, यांचेकडून घरामध्ये
बंदी असलेले व्यक्ती तसेच आरोपी व त्याचेकडे असलेले हत्यारा संबंधाने व त्याचे मागणी संबंधाने माहीती घेतली. डॉ. अक्षय शिंदे, पोलीस उपायुक्त, परीमंडळ कमांक ०४, नागपूर शहर तसेच डॉ. निलेश पालवे, सहायक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, नागपूर शहर हे सुध्दा घटनास्थळी हजर होते व घटनेची माहीती घेवून मार्गदर्शन करीत होते.

पोलीस निरीक्षक भोसले यांनी वेठीस धरलेले आरोपी ५० लाखाची
खंडणी मागत असून आरोपी बददल माहती मिळविणेकरीता व आतील परीस्थीती जाणून घेण्यासाठी २ लाख २ वेळा या प्रमाणे रू. ४ लाख दिल्याचे सांगीतले. तसेच तळ माळयावर दोनमहीला व एक मुलगी बेठीस धरली असून पहिल्या माळयावर एक महीला व दोन मुले वेठीस धरण्यात आली आहे असे हजर असलेले वरीष्ठ अधिकारी यांना सांगीतले. तीन महीला व मुलीस दक्षीणमुखी मुख्य दरवाजा असलेल्या हॉलमध्ये वेठीस धरून मुख्य दरवाजाचे बाजूस असलेले पुर्वकडील खिडकीतून पैसे घेत असून तेथे असलेले मुलीचे गळयावर चाकू लावत असल्याचे सांगीतले.

परीसरात लागलेले कॅमेऱ्यातून बाहेरील परीस्थीतीवर लक्ष ठेवून आहे असे सांगीतले. त्यानूसार  डॉ. अक्षय शिंदे, पोलीस उपायुक्त, परीमंडळ कमांक ०४, नागपूर शहर तसेच डॉ.निलेश पालवे, सहायक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, नागपूर शहर यांचेसोबत गजानन राजमाने, गुन्हेशाखा, नागपूर यांनी चर्चा करून पोनि भोसले याना मार्गदर्शन करून पोस्टे हुडकेश्वर येथील कर्मचारी तसेच साध्या कपड्यातील कर्मचारी व गुन्हेशाखा येथील पथकांनी घटनास्थळाला घेराव टाकला. तसेच योजना करून राजु वैद्य याचे घराचे आत असलेल्या आरोपीस परत २ लाख रूपये देवून आतील आरोपीस गाफील करून ताब्यात घेण्याचे ठरविले. परंतू आरोपीगाफील न होता त्याने २ लाख रुपये स्वीकारले.

त्यानंतर अंगणातील पश्चीमेकडील मुख्य गेट समोरील कॅमेरा निकामी केला व पोउपआयुक्त  गजानन राजमाने यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हेशाखा नागपूर सपोनि स्वप्नील भुजबळ, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि सत्यवान कदम पोस्टे हुडकेश्वर, पोहवा बबन राउत, गुन्हेशाखा, नापोशी प्रशांत कोडापे गुन्हेशाखा पोस्टे हुडकेश्वर.येथील पोहवा शैलेष ठवरे, नापोशी अश्वीन बडगे, नापोशी आशिष तितरमारे, पोशी प्रदिप बदाडे,
पोहवा मनोज नेवारे, नापोशी ललीत तितरमारे, नापोशी चंद्रशेखर भारती असे अंगणात शिरून घराचे पश्चीमेस असलेले मागील भागात प्रवेश केला. घराचे पश्चीमेकडील मागील बाजूस असलेला संडासाजवळील कॅमेरा निकामी केला. तसेच वरील माळयावर असलेले महीला हर्षल राजू वैदय (वय ३७ वर्षे) या मागील गॅलरीत आल्या असता संडासावर चढून त्यांचेकडून आतील परीस्थीतीची माहीती घेण्यात आली. आणि आतील आरोपीस कोणत्याही प्रकारचा सुगावा लागू न देता व योजना आखून पहील्या माळयावर असलेल्या हर्षल राजू वैद्य (वय ३७ वर्षे), चिउ बंडुजी वैद्य (वय २० वर्षे), विहान राजू वैद्य (वय ६ वर्षे रा. सर्व प्लॉट कमांक ०१, पिपळा फाटा हुडकेश्वर रोड,नागपूर) यांची सुटका करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी आखलेल्या योजनेनुसार संडासावरून मागील गॅलरीतील उघडया असलेले दरवाज्यातून पोउपआयुक्त  गजानन राजमाने.यांचेसह सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हेशाखा नागपूर सपोनि स्वप्नील भुजबळ, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि सत्यवान कदम पोस्टे हुडकेश्वर, पोहवा बबन राउत, नापोशी प्रशांत कोडापे, गुन्हेशाखा नागपूर यांनी घराचे आत प्रवेश केला. घराचे आत प्रवेश करून पहील्या माळयावर बारईकाईने पाहणी केली. त्यानंतर तळमजल्यावर खाली उतरणाऱ्या पायऱ्याकडील दरवाजा हळूच उघडून खाली उतरून खालील परीस्थीतीचा अंदाजा घेतला असता आरोपी याने समोरील हॉलमध्ये महीलांना वेठीस धरून तेथे सतर्क असल्याचे त्याचे बोलने व हालचालीवरून तसेच बाजुच्या इमारतीवर असलेल्या साध्या पोषाखातील कर्मचारी यांनी इशारा करून कळविल्याने समजले.
त्यामुळे वर पहीले माळयावर जावून आरोपीस गाफील करण्याची योजना आखण्यात आली.

आतमध्ये हॉल लहान असल्याने व पिस्टलने आरोपीवर फायर केल्यास बुलेट भिंतीवर.आदळून परावर्तीत होवून वेठीस धरलेले महीलांना किंवा पोलीस पथकास लगण्याची शक्यता असल्याने शक्यतोवर पिस्टलचा वापर न करता आरोपी गाफील असतांना त्याला जेरबंद करण्याची योजना आखली. त्यानुसार मागील पश्चीमेकडील भागातून आरोपीचा आवाज ऐकू आल्याने व सदर घटनास्थळाला घेरून असलेल्या बाजूचे इमारतीवरील साध्या पोशाखातील पोलीसांनी इशारा करून कळविल्याने आरोपी गाफील असल्याचे खात्री झाल्याने याच संधीचा फायदा घेवून पोलीस उपायुक्त  गजानन राजमाने, सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, सपोनि स्वप्नील भुजबळ, नापोशी प्रशांत कोडापे असे पायऱ्यातून खाली उतरून वेठीस धरलेले महीला हॉलमध्ये असल्याचे कानोसा
घेवून बाहेरून बंद असलेले दक्षीण मुखी द्वार हळूच उघडले व लपून पाहणी केली असता वेठीस धरलेल्या तीन महिला हॉलमध्ये बसले असल्याची खात्री करून लपूनच आत प्रवेश करत असतांना आरोपी हा हॉलमध्ये आला असता योजनाबध्द रित्या मोठया शिताफीने त्याचेवर झडप घालून आरोपी  जितेंद्र याला अटक केली. त्यास निशस्त्र करून त्याचे हातातील शस्त्र एक लोखंडी चाकू व माउजर पोस्टे हुडकेश्वर येथील अधिकारी यांनी रितसर जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त केले तसेच आरोपीने खंडणी म्हणून घेतलेली रक्कम ५ लाख रूपये देखील पंचनाम्याप्रमाणे जप्त केले तसेच तळमजल्यावर वेठीस धरलेल्या  वैशाली बंडूजी वैद्य, श्वेता बंडूजी वैद्य, वच्छलाबाई रघूनाथजी वैद्य यांना मुक्त करून बाहेर सुरक्षीतपणे काढण्यात आले.

आरोपीस सविस्तर विचारणा केली असता त्याने राजू वैद्य याचे हुडकेश्वर रोडवरील मोठे घर तसेच त्याचेकडे असलेले महागडया ४ चाकी गाडया पाहून व राजू वैद्य हा लँड डेव्हलपर्स व बिल्डर असल्याचे माहीती असल्याने त्याचेकडून त्वरीत मोठी रक्कम प्राप्त करता येईल म्हणून आरोपीने योजनाबध्द पध्दतीने राजू वैद्य याचे घरी १२ वाजता घरात प्रवेश करून त्याचे घरात हजर असलेले महीला व मुलींना अग्नीशस्त्र व प्राणघातक चाकूने धाक दाखवून
५० लाख रू उकळणार होता असे सांगीतले.

सदरची कामगिरी नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी यांचे निर्देशान्वये पोलीस उपायुक्त, परीमंडळ कमांक ०४, नागपूर शहर डॉ. अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शनात तसेच मा. पोलीस उपायुक्त (डिटेक्शन)  गजानन शिवलींग राजमाने यांचे उपस्थीतीत व नेतृत्वात  सहायक पोलीस आयुक्त(सक्करदरा विभाग) डॉ. निलेश पालवे, सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे)  बी. एन. नलावडे यांचे उपस्थीतीत वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोस्टे हुडकेश्वर श्री प्रतापराव भोसले, सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हेशाखा नागपूर, सपोनि स्वप्नील भुजबळ, पोस्टे हुडकेश्वर, सपोनि सत्यवान कदम पोस्टे हुडकेश्वर, पोहवा बबन राउत, गुन्हेशाखा, नापोशी प्रशांत कोडापे गुन्हेशाखा पोस्टे हुडकेश्वर येथील पोहवा शैलेष ठवरे, नापोशी अश्वीन बडगे, नापोशी आशिष तितरमारे, पोशी प्रदिप बदाडे, पोहवा मनोज नेवारे, नापोशी ललीत तितरमारे, नापोशी चंद्रशेखर भारती यांनी केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.