सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायांना सशर्त परवानगी द्या – महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : पुणे मनपा हद्दीत सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला अटीं-शर्थींसह परवानगी द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यानी ट्विट करत दिली आहे.
पुणे मनपा हद्दीत सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला अटीं-शर्थींसह परवानगी द्यावी आणि पुणे शहरात नव्याने लागू केलेली नियमावली पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट भागातही करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे महापौर मुरलीधर मोहोळ यानी केली आहे
सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायांना राज्य सरकारने सशर्त परवानगी द्यावी !
पुणे मनपा हद्दीत सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला अटीं-शर्थींसह परवानगी द्यावी आणि पुणे शहरात नव्याने लागू केलेली नियमावली पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट भागातही करावी, अशी मागणी आज राज्य सरकारकडे केली. pic.twitter.com/x9xL2xy3kn
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 4, 2021
पुण्यात काय सुरु राहणार?
१. सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार
२. शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार
३. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक १४ एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.
४. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील
५. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
६. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
७. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरु करणेस मुभा राहील.
पुण्यात काय बंद असणार?
१. पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार
२. शनिवार आणि रविवार सकाळी ७ ते २ यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार.
३. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!