आता केंद्र सरकार देणार तेल बियाणे मोफत,शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप (उन्हाळी) पिकांसाठी तेलबिया बियाणे मोफत दिले जाईल.

कोरोना संकट काळात (Corona Virus)  पेट्रोल आणि डिझेलसह खाद्य तेलाचे दरही वाढलेले आहेत. या दिवसात खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना तेलबिया बियाणे मोफत देणार आहे, जेणेकरून लोकांना स्वस्तात खाद्यतेल मिळू शकेल.

या निर्णयामुळे तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि अतिरिक्त आयातीवरील अवलंबन कमी होईल, असे सरकारला वाटते. मात्र, १९६० च्या दशकातील विंटेजची कल्पना आज चांगले परिणाम देऊ शकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप (उन्हाळी) पिकांसाठी तेलबिया बियाणे मोफत दिले जाईल. शेतकऱ्यांना उच्च प्रतीची (high-quality) हजारो पॅकेट्स दिले जातील. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार सुमारे ८००,००० सोयाबीन बियाणांचे मिनी किट आणि ७४,००० शेंगदाणा बियाणांचे मिनी किट देणार आहे.

आतापर्यंत चे वाढलेले दर:

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वर्षाच्या आकडेवारीनुसार, खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक लिटर मोहरी तेलाची सरासरी किंमत मेमध्ये १७०/- रुपयांवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात १२०/- रुपये होती. त्याचप्रमाणे शेंगदाणा तेल, सोया तेल, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किंमती गेल्या दशकात उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.

यावर्षी जुलैपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामात तेल बियांतर्गत ६.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर तेल पेरण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. यातून १.२ लाख क्विंटल तेलबिया आणि २४.३ लाख क्विंटल खाद्यतेल उत्पादन होण्याची शक्यता आहे.

नक्की कोणाला फायदा होणार:

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील ४१ जिल्ह्यांमध्ये आंतरपिकासाठी ७६.०३ कोटी रुपये खर्च करून सोयाबीनचे बियाणे वाटप केले जाईल. यामुळे १.४७ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची पेरणी होईल. याव्यतिरिक्त १०४ कोटी रुपये किंमतीचे सोयाबीन बियाणे आठ राज्यात वितरित केले जाईल, ज्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातमधील ७३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये ३,९०,००० हेक्टरचे क्षेत्र लागवडीखालील असेल.

याचबरोबर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ९० जिल्ह्यांमध्ये जवळपास ८.१६ लाख बियाण्यांचे मिनी किट वाटप केले जाईल. येथे लागवडीखालील क्षेत्र १०.०६ लाख हेक्टर असेल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.