अनैतिक संबंधातून दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पतीचा खून ; उरुळी देवाची मधील धक्कादायक घटना
पुणे: पुण्यातील उरुळी देवाची येथे एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती.पोलिस तपासात संशयास्पद मृत्यूचे खुनात रूपांतर झाल्याचे निष्पन्न झाले. यात लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध सुरु ठेवण्यात अडथळा ठरणार्या पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले.याप्रकरणी लोणी काळभोरपोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. उरळी देवाची), गौरव संतोष सुतार (वय १९, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनोहर हांडे (वय २७, रा़ उरुळी कांचन) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतन बाबासाहेब निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची येथे मनोहर हांडे यांचा २४ मेला मृत्यु झाला होता.त्याबाबत मयताची पत्नी आश्विनी हांडे हिने तिचा पती मनोहर हा कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे सांगीतले होते. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास पोलीस उप-निरीक्षकनिकेतन निंबाळकर हे करीत होते.
तसेच समांतर तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन तपास पथक करीत असताना दि. 4 जून रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर व पोलीस कॉन्सेबल दिगंबर साळुके यांना मनोहर हांडे याचे मरणाबाबत साशंकता असल्याची खबर मिळाली.
तपासादरम्यान अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून त्यातूनच घातपात झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन चौकशी तपास केला असता त्याने व आश्विनी हांडे हिने मिळुन मनोहर हांडे यांस सुरूवातीला झोपेच्या गोळया देवुन बेशुध्द केले व नंतर त्याचे तोंड व गळा दाबुन खुन केल्याचे कबुल केले. तर आश्विनी हांडे हिस ताबेत घेवुन दोघांकडे अधिक तपास करता,त्यांनी सांगितले की, त्यांचे सुमारे दोन वर्षापासुन प्रेमसंबंध असुन आश्विनी हिचा पती मनोहर यास प्रेमसंबंधाबाबत समजले होते.
तसेच मनोहर हा कोरोना पॉझीटीव्ह असल्याने सुमारे 15 दिवसांपासुन घरीच राहुन उपचार घेत असल्याने अनैतीक संबंधास अडसर ठरत होता.त्यामुळे यांनी मनोहर याचा खुन करून तो कोरोनाने मेल्याचा बनावाचा कट रचला होता. त्याप्रमाणे 30 मे रोजीच्या रात्री गौरव याने आश्विनी हिस झोपेच्या गोळया आणुन दिल्या.
मनोहर हांडे याचे अश्विनीशी जानेवारीमध्ये लग्न झाले होते. गौरव व अश्विनी यांचे प्रेमसंबंध होते. त्यात मनोहर याचा अडथळा ठरत येत होता. गौरव याने अश्विनी हिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने मनोहर याला दुधातून या गोळ्या दिल्या. त्यामुळे मनोहर गाढ झोपी गेल्यावर मध्यरात्री २ वाजता त्यांनी गळा दाबून त्याचा खुन केला. त्यानंतर गोळ्यांचे पाकिट फेकून दिले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक सुभाष काळे अधिक तपास करीत आहेत.
आश्विनीने त्या गोळया मनोहरला दुधामधुन दिल्या. त्यानंतर मनोहर झोपल्याची खात्री झालेवर गौरव याने मनोहर याचे घरी जावुन आश्विनी व गौरव या दोघांनी मिळुन मनोहर याचा तोंड व गळा दाबुन खुन केला. त्यानंतर गौरव तेथुन निघुन गेला व आश्विनी हिने वरील मजल्यावर राहणारी तिचे आईस मनोहर हा झोपेतुन उठत नाही असे सांगुन तो झोपेतच कोरोना आजाराने मेला असल्याचा बनाव केला.
तीने पोलिसांनाही देखील मनोहर हा कोरोनामुळे मयत झाला असल्याचे सांगितले होते. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात मनोहरचा गळा दाबल्याने व श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे पुढे
आले होते. सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मयत नोंद दाखल करुन पुरावा उपलब्ध नसताना फक्त मिळाले खबरिच्या आधारे कौशल्याने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) सुभाष काळे हे करीत आहेत.
ही कामगिरी तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, उपनिरीक्षक केतन निंबाळकर, पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनिल गलोत, प्रमोद गायकवाड,रोहीदास पारखे, दिगंबर साळुके, निखील पवार, राजेश दराडे, बाजीराव वीर, लेश कुदळे यांचे पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!