गॅस सिलिंडरवरील हा कोड तपासून घ्या; नाहीतर होऊ शकतो मोठा अनर्थ

मुंबई :स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस) भारतातील अगदी छोट्या-छोट्या आणि कच्चा घरांपर्यंत जलदगतीने पोहोचला आहे. स्वयंपाकाचा गॅस केवळ घरगुती लोकांसाठी सुविधाजनक नाही, तर आपल्या आसपासच्या वातावरणासाठी खूप उपयुक्त आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस आपल्या अनेक समस्या संपवत आहे, तर दुसऱ्या बाजूला या गॅस सिलिंडरच्या धोकादायक परिणामांच्या बातम्याही समोर येत आहेत

गॅस सिलिंडरचा वापर आपण स्वयंपाकासाठी करतो तसाच त्याचा वापर बाकीच्या कामांसाठी पण होत असल्याचे दिसून आले आहे. गॅस सिलिंडरचा वापर घरात करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. गॅस सिलिंडर वापरताना काळजी घेतली तर आपण जीवितहानी आणि आर्थिक हानीपासून आपला आणि कुटुंबाचा बचाव करू शकतो.

आपल्या घरी येणारा गॅस हा काही विशिष्ट टेस्ट पास होऊन येत असतो. एलपीजी गॅस सिलिंडरचे आयुष्य सरासरी १५ वर्षांचे असते.आपल्या सर्व्हिसदरम्यान सिलिंडरला आणखी दोन वेळा टेस्टसाठी पाठवले जाते. अशा प्रकारे सिलिंडरची अनेकदा टेस्ट केली जाते. वापरासाठी पाठवण्यापूर्वी सिलिंडरची दोन वेळा टेस्ट केली जातेच. त्याचबरोबर सर्व्हिस दरम्यानसुद्धा दोन वेळा टेस्ट करण्यात येते. सर्व्हिस दरम्यान सिलिंडरचा पहिली टेस्ट 10 वर्षांनंतर होते, त्यानंतर पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा टेस्ट केली जाते.

टेस्टिंगदरम्यान सिलिंडरच्या लिकेजची तपासणी करण्यासाठी पाण्याने भरून हाइड्रो टेस्ट केली जाते. याव्यतिरिक्त प्रेशर टेस्टदेखील केली जाते. एका सिलिंडरवर सामान्य पे्रशरच्या तुलनेत पाच पट अधिक प्रेशर टाकले जाते. ज्या सिलिंडरकडून मानकांची पूर्तता होत नाही, अशा प्रकारचे सिलिंडर नष्ट केले जातात.

गॅस सिलिंडर सहज उचलता यावे म्हणून त्याच्यावर २ ते ३ इंचावर पट्या लावल्या जातात. त्या पट्यांच्या आधाराने आपण गॅस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो. सिलिंडरच्या पट्यांवर एक कोड लिहिलेला असतो.त्या कोडची सुरुवात ए, बी, सी आणि डी अक्षरांपासून केली जाते.

‘ए’चा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांसाठी केला जातो. तर ‘बी’चा वापर एप्रिल, मे आणि जून या महिन्यांसाठी केला जातो. ‘सी’चा वापर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांसाठी केला जात आहे. ‘डी’ वापर आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांसाठी केला जातो. याव्यतिरिक्त दोन अंकांचे नंबर वर्षाचे शेवटचे दोन अंक असतात.

यावरूनच गॅस सिलिंडरबाबत किती काळजी घ्यावी लागते हे दिसून येते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.