शारीरिक संबंधाच्या बहाण्याने घेतला व्हॉटसअप नबंर; नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन ऑन लाईन पध्दतीने उकळले पैसे
पुणे : एका पुरुषाचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन त्याच्याकडून ऑन लाईन पध्दतीने ९५७ रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुक अकाऊंटधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने फेसबुकवरील नताशा नावाच्या तरुणीविरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,कोंढवा येथील तक्रारदार तरुणाला फेसबुकवरील मेसेंजरवरुन नताशा नावाच्या तरुणीने मेसेंज पाठवला होता. तीने शारीरिक संबंधाच्या बहाण्याने त्याचा व्हॉट्सअॅप Whatsapp नंबर मागून घेतला. त्यानंतर त्याला व्हिडीओ कॉल करुन नग्न होण्याची विनंती केली. तो नग्न होताच त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला.त्यानंतर त्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली.मात्र त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने त्याने ९५७ रुपयांची खंडणी गुगल पे व्दारे दिली
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!